Breaking News

मंत्र्यांवर उपचाराची गरज


काँग्रेस पक्षानं गांधीजींच्या नावाचा फक्त राजकीय लाभासाठी वापर केला आहे. गांधीजी कधीच काँग्रेसचे नव्हते आणि महत्वाचं म्हणजे गांधीजींची विचारधारा ही भाजपचीच होती, असं महाजन यांनी केलं. महात्मा गांधी यांचं हे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आहे. त्यानिमित्तानं भाजपनं त्यांचा उदोउदो करण्याचं ही समर्थन करता येईल. काँग्रेसनं गांधीजींच्या नावाचा राजकीय लाभासाठी वापर केला, ही टीका करण्याचाही महाजन यांना अधिकार आहे ; त्यापुढचं महाजन यांचं वक्तव्य राजकीय, ऐतिहासिक अज्ञानातून आलं आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. भाजपनं गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त जयंती ते पुण्यतिथी असा कार्यक्रम आखला असून जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी गांधी पदयात्रा काढण्यात येणार आहे. गांधीजींचे विचार समाजात पोचविण्यासाठी भाजप असा प्रयत्न करीत असेल, तर त्याचंही स्वागत करायला हवं ; परंतु या निमित्तानं इतिहासाची मोडतोड केली जाणार असेल, तर ती मान्य करता येणार नाही. गांधीजी कधीच काँग्रेसचे नव्हते, असं महाजन यांचं म्हणणंही धादांत खोटं आहे.
एखादा वेगळं बोलायला लागला, तर खेड्यापाड्यात त्याला ठाण्याला किंवा पुण्याला हलवा, असं म्हण्याची प्रथा आहे. त्याचं कारण त्याचं बरळणं हे सामाजिक स्वास्थ्यासाठी चांगलं नसतं. वेळीच उपाय केले नाहीत, तर संबंधित व्यक्ती हातात दगड घेऊन इतरांच्या मागं लागतील, असं म्हटलं जायचं. मंत्री हा कायदेमंडळाचा सदस्य. लोकशाहीनं त्याच्यावर मोठी जबाबदारी टाकलेली. त्यानं असंबंद्ध बोलू नये, ही माफक अपेक्षा ; परंतु देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्रीही अतार्किक बोलायला लागले आहेत. ते बोलताना आपण कधीकाळी इतिहासात काय शिकलो, याचा विसरही त्यांना पडला असावा. कदाचित त्यांना कॉलेजमध्ये वेगळं शिकविलं गेलं असावं. किंवा शिकविलं जात असताना यांचं लक्ष ब्रम्हनंदी लागलेलं असावं. आपल्याला राजकारणात चांगलं यश मिळत असल्यानं आपण म्हणू तेच लोक ऐकतील, असाही त्यांचा समज झालेला असावा. लोकांची स्मरणशक्ती कमी असते, असं समजून कुणी केव्हाही काहीही बोललं आणि लोकांनी ते निमूट ऐकलं असा त्यांचा समज असेल, तर त्यांचा तो गैरसमज सहा महिन्यांनी होणार्‍या निवडणुकीत लोक दूर करायलाही कमी करणार नाहीत. किमान तेवढं भान तरी मंत्र्यांनी ठेवलं पाहिजे. तसं ते ठेवलं नाही, तर समाजमाध्यमांत आपल्या वक्तव्याविषयी काय प्रतिक्रिया उमटतात, हे तरी पाहायला हवं. म्हणजे यापुढं तरी बोलताना तारतम्य बाळगता येईल. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर ही समाज माध्यमांत लहानपणी हे डोक्यावर पडलं होतं, ही जी प्रतिक्रिया उमटली, तिच्यातून तरी ते बोध घेतील, असं आपण समजू या.

काँग्रेस पक्षानं गांधीजींच्या नावाचा फक्त राजकीय लाभासाठी वापर केला आहे. गांधीजी कधीच काँग्रेसचे नव्हते आणि महत्वाचं म्हणजे गांधीजींची विचारधारा ही भाजपचीच होती, असं महाजन यांनी केलं. महात्मा गांधी यांचं हे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आहे. त्यानिमित्तानं भाजपनं त्यांचा उदोउदो करण्याचं ही समर्थन करता येईल. काँग्रेसनं गांधीजींच्या नावाचा राजकीय लाभासाठी वापर केला, ही टीका करण्याचाही महाजन यांना अधिकार आहे ; त्यापुढचं महाजन यांचं वक्तव्य राजकीय, ऐतिहासिक अज्ञानातून आलं आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. भाजपनं गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त जयंती ते पुण्यतिथी असा कार्यक्रम आखला असून जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी गांधी पदयात्रा काढण्यात येणार आहे. गांधीजींचे विचार समाजात पोचविण्यासाठी भाजप असा प्रयत्न करीत असेल, तर त्याचंही स्वागत करायला हवं ; परंतु या निमित्तानं इतिहासाची मोडतोड केली जाणार असेल, तर ती मान्य करता येणार नाही. गांधीजी कधीच काँग्रेसचे नव्हते, असं महाजन यांचं म्हणणंही धादांत खोटं आहे. महात्मा गांधी यांनी काँग्रेसच्या अनेक अधिवेशनात हजेरी लावली आहे. त्यांनी काँग्रेसचा अध्यक्ष कोण असावा, यावरही मतप्रदर्शन केलं आहे. किंबहुना सुभाषचंद्र बोस यांच्या निवडीच्या वेळी झालेला वादही सर्वज्ञात आहे. गोलमेज परिषदांना गांधी जेव्हा उपस्थित राहत, तेव्हा ते काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून जात. भाजपच्याच म्हणण्यानुसार महात्मा गांधी यांनी सरदार वव्लभभाई पटेल यांना डावलून पंडित नेहरू यांना पंतप्रधान केलं. तसं असेल, तर गांधी यांचा काँग्रेसवर किती प्रभाव होता, हे विसरता येणार नाही. असं असताना महाजन यांना गांधी काँग्रेसचे कधीच नव्हते, असं म्हणता येणार नाही; परंतु बात्रा यांचा नवा इतिहास रुजवू पाहणार्‍या महाजनांना तेवढं भान कुठून यायचं ?

भाजपची पितृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली. महाजन यांच्या म्हणण्याप्रमाणं गांधी हे जर भाजपच्याच विचाराचे होते, तर मग भाजपच्याच विचाराच्या गांधी यांची संघ विचारांच्या गोडसे यांनी हत्या का करावी ? देशात 1952 नंतर संसदीय लोकशाही आली. त्या वेळी जनसंघ, हिंंदू महासभा अशा हिंदुत्त्ववादी विचारसरणीच्या संघटना होत्या. राजकीय पक्ष होते. जनसंघाचं नंतर जनता पक्षात रुपांतर झालं. भाजपची स्थापना तर 1980 नंतरची. महात्मा गांधी यांची हत्या 1948 मध्ये झाली असेल, तर या राजकीय पक्षाच्या जन्माआधीच महात्मा गांधी यांनी त्यांचे विचार कसे आत्मसात केले होते, हे न उलगडणारं कोडं आहे. गांधी यांची हत्या झाली, तेव्हा महाजन यांचा जन्मही झाला नसेल. तरी त्यांना हा ऐतिहासिक संदर्भ कळू नये, याला काय म्हणावं ? आतापर्यंतच्या इतक्या वर्षांत जनसंघ, जनता पक्ष, भाजपनं गांधी यांच्या विचारांवर केलेली टीका मग आपल्याच विचारांवर केलेली टीका मानायची का ? गांधीजींच्या विचारांनुसार कँाग्रेस नव्हे, तर भाजप चालत आहे. त्यांच्या विचारांचं अनुकरण भाजप करत आहे. भाजप कार्यकत्यांनी राम नामाचा जप करावा आणि गांधींच्या विचारांवर मार्गक्रमण करावे असा सल्ला महाजन यांनी दिला. संघाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांना हे राम म्हणायला लावल्यामुळं आता भाजपला त्यांच्यात आणि आपल्यात साम्य आहे, असा साक्षात्कार झाला असावा.

बेताल वक्तव्य करणार्‍या नेत्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील आणखीन एका नावाची भर पडली आहे. हे नाव म्हणजे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते. एसटी कर्मचार्‍यांचे पगार इतके वाढले आहेत, की ते आता वेडे झाले आहेत असं धक्कादायक विधान रावते यांनी केलं आहे. पगार वाढल्यानंतर कुणाला वेड लागतं, हा नवा साक्षात्कार आता झाला आहे.