Breaking News

विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पाचवे राज्य अधिवेशन संपन्न संविधान स्थिर असेल तर येणार्या सर्व पिढ्या स्थिर राहतील - डॉ. साळुंखे

विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पाचवे राज्य अधिवेशन संपन्न

संविधान स्थिर असेल तर येणार्या सर्व पिढ्या स्थिर राहतील - डॉ. साळुंखे
अहमदनगर- संविधान तुम्हाला जगायला शिकवते, ते जपण्याचे काम आपले आहे. जर संविधान साबित राहिले तर आपल्या पिढ्यान् पिढ्या साबित राहतील. असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक प्रा. आ.ह. साळुंखे यांनी केले. ते विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पाचव्या राज्य अधिवेशनाप्रसंगी बोलत होते.
 ते म्हणाले, आम्ही जो विद्रोह करतो, तो सिंधू संस्कृतीपासून तर आजच्या गाडगे बाबा व फुले शाहु आंबेडकराच्या काळापासून करतो. ती आमची संस्कृती आहे. या महान लोकांचा प्रभाव आमच्यावर आहे.   यांच्यापासूनच प्रकर्शाने विद्रोहाची निर्मिती झाली. विद्राेहा जात नसते, आमुचा म्हणून काम केले जाते. हे काम करताना मानवता व विवेकी परंपरेचा पुरस्कार आपण करावा. विद्रोह म्हणजे केवळ नकार, विद्वंस, विनाद नाही. तर मानवतेला काळींबा फासणार्या घटनांच्या विरोधांचा मेळ आहे. या विघातक बेड्या तोडायच्या आहे. हाच आपला उद्देश आहे. चांगला माणूस घडविणे, जगण्याला बहर आणणे हे उद्दिष्ठ विद्रोहाचे आहे. असे साळुंखे म्हणाले.
यावेळी प्रमुख पाहुणे जेष्ठ साहित्यिक प्रा. आ.ह. साळुंखे, जेष्ठ आदिवासी साहित्यिक कॉ. नजुबाई गावीत होत्या. तसेच राज्य निमंत्रक कॉ.वाहरुभाई सोनवणे, कॉ. धनाजीराव गुरव, आयु. गौतम कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नगरचे निमंत्रक कॉ. गंगाराम काकडे, प्रा. भास्कर बुलाखे, प्रा. बापू चंदनशिवे, डॉ. जालिंदर धिगे, आयु. सागर दोंदे, राेहित तेलतुंबडे, कुमार भिंगारे, राहिणी कोरडे यांनी योगदान दिले.
-----------
सागर शिंदे
गणेश ठोंबरे