तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोर्‍यात पश्‍चिमेचे पाणी वळवा : कोल्हे


कोपरगाव/प्रतिनिधी
उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे आहे. त्यामुळे या तुटीच्या खोर्‍यात असलेल्या पाण्यांचे वाटप होवु शकत नाही. परिणामी येथील शेती व पिण्यांच्या पाण्यांच्या योजना धोक्यात आल्या आहेत. त्यासाठी पश्‍चिमेचे समुद्राला वाहुन जाणांरे पाणी पुर्वेकडे वळवुन नदीजोड कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनांने यासाठी भरघोस निधी देवुन हे काम प्राधान्यांने मार्गी लावावे अशी मागणी गोदावरी कालवे पाटपाणी संघर्ष समितीचे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे व आ.स्नेहलता कोल्हे यांनीकेंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

नितीन गडकरी हे नाशिक येथे विविध कार्यक्रमांसाठी बुधवारी आले असतांना आ.स्नेहलता कोल्हे यांनी त्यांची भेट घेत हे निवेदन सादन करून समन्यायी पाणी वाटपाच्या फटक्यामुळे तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोर्‍यातील पाणी जायकवाडीसाठी सोडण्यांचा निर्णय घेतल्यांने तसेच चालु वर्षी पाउस न झाल्यांने दुष्काळजन्य परिस्थिती आहे त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांची तसेच निळवंडे धरण कालव्यांच्या कामाबाबत चर्चा केली. माजीमंत्री शंकरराव कोल्हे म्हणांले की, जलसिंचन आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष माधवराव चितळे यांनी पश्‍चिमेचे अतिरिक्त पाणी पुर्वेकडे वळविल्याखेरील नगर नाशिक सह मराठवाडयाचा पाणीप्रश्‍न सुटू शकणार नाही असा अहवाल शासनांस सादर केलेला आहे. या अहवालानुसार तत्कालीन महाराष्ट्र शासनांने त्यास तत्वत: मान्यता देवुन पश्‍चिमेचे पाणी पुर्वेकडे वळवावे म्हणून मंजुरी दिलेली आहे. पण या कामाला गती नाही. आ.स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, नदी जोड प्रकल्पांतर्गत पश्‍चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्यांची योजना प्राधान्यांने हाती घेवुन त्यास भरघोस निधी मिळाल्यास त्याचा लाभ नगर नाशिकसह मराठवाडयातील शेतकर्‍यांना होईल अन्यथा पाण्यांचा प्रश्‍न गंभीर बनेल. तुटीच्या उर्ध्व गोदावरी खो-यातील धरणांतही पाण्यांची मारामार आहे परिणामी बारमाही गोदावरी कालवे तहानलेले आहेत, प्रत्येक वर्षी पर्जन्यमान कमी होत असल्यांने त्याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना व फळबागधारकांना बसुन कोटयावधी रूपयांचे नुकसान होत आहे, तुटीच्या पाण्यांचे वाटप कधीच होत नाही त्यासाठी पाणी सरप्लस करावे मगच त्याचे वाटप करावे व पश्‍चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्यांस प्राधान्य द्यावे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget