Breaking News

रासायनिक पाणी नमूने संकलनात जिल्हा राज्यात अव्वल


बुलडाणा,(प्रतिनिधी): शासनाच्या वतीने दोन वेळा रासायनिक नमूने अभियान राबविले जात असते. या अनुषंगाने जिल्ह्यात सन 2018-19 या आर्थिक वर्षात जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांचे नेतृत्वात अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत असून जिल्हा राज्यामध्ये अव्वल भरला आहे. ग्रामीण जनतेला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणेच्या दृष्टीकोनातून पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक पाणी तपासणी ही शासनस्तरावरून प्राप्त निर्देशानुसार नियमित केली जात असते. या अनुषंगाने मोबाईल अ‍ॅप्लीकेशनुसार जिल्ह्यामध्ये 6841 स्त्रोत ऑनलाईन असल्याचीबाबतची शासनाच्या संकेतस्थळावर नोंद आहे. 

स्त्रोतांचे रासायनिक पाणी नमूने तपासणी अभियान सद्यस्थितीत राबविले जात आहे. पाणी व स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक तायडे यांचे मार्गदर्शनात जलसुरक्षक, गट समन्वयक, समुह समन्वयक, उपविभागाचे पाणी गुणवत्ता तज्ञ स्वच्छता मिशन कक्ष मोहीम स्वरूपात काम करत असून त्यांचे तालुकास्तरावर सनियंत्रण विस्तार अधिकारी, पंचायत, विस्तार अधिकारी आरोग्य करत आहे. जिल्ह्यातील तालुक्यांमधून पाणी नमुने गोळा करण्याचे शेगांव व मलकापूर या दोन तालुक्यांनी 100 टक्के उद्दीष्ट पुर्ण केले असून तालुक्यात 31 ऑक्टोबरपर्यत पुर्ण करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या सहा प्रयोगशाळांमध्येे पाणी नमून्यांचे तपासणी करण्याचे काम सुरू आहे. रासायनिक पाणी नमूने संकलनातील 13 तालुक्यांची आकडेवारी शेगांव तालुक्यातील 374 रासायनिक पाणी नमूने संकलनातील पैकी 374 चे पुर्ण उद्दीष्ट त्याचप्रमाणे मलकापूर तालुक्यातील 229 पैकी 229, बुलडाणा तालुक्याने 797 पैकी 430, चिखली तालुक्यातील 728 पैकी 445, देऊळगांवराजा तालुक्यातील 277 पैकी 172, जळगांव जामोद 536 पैकी 364, खामगांव 818 पैकी 491, लोणार 462 पैकी 268, मेहकर 687 पैकी 343, मोताळा 481 पैकी 277, नांदूरा 421 पैकी 336, संंग्रामपूर 583 पैकी 417, सिंदखेडराजा 448 पैकी 260 याप्रमाणे उद्दीष्ट साध्य झालेले आहे.