Breaking News

विवाहितेचे स्वाईन फ्ल्यूसदृश्य आजाराने निधन

।संगमनेर/प्रतिनिधी।

तालुक्यातील मनोली येथील सविता गोविंद ठोसर (वय-४५) या विवाहित महिलेचा स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराने शुक्रवारी दि. ५ पहाटे निधन झाले. तालुक्यात स्वाईन फ्ल्यूने घेतलेला हा आठवा बळी ठरला आहे.

मनोली येथील मयत सविता ठोसर गेल्या ४ ते ५ दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांच्यात सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान शुक्रवारी पहाटे त्यांची अखेर प्राणज्योत मालवली. दरम्यान तालुक्यात अनेक रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याने या आजाराच्या बाबतीत आरोग्य विभाग अनभिज्ञ असल्याचे चित्र दिसते. मयत सविता ठोसर पश्‍चात पती, आई, वडील, सासू, सासरे, दोन मुले असा परिवार असल्याने त्यांच्या मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी सकाळी मनोली येथे त्यांच्या पार्थीवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.