Breaking News

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिसांना आसामच्या व्यक्तीचा ई-मेल


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मोदींना धमकी देणारा ई-मेल दिल्ली पोलीस आयुक्तांना आसामच्या एका व्यक्तीने पाठवला असल्याचे उघडकीस झाले आहे. मोदी यांना नोव्हेंबर 2019मध्ये यांना ठार करू, असे ई-मेलमध्ये म्हटले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोदींना धमकी देणारा ई-मेल केवळ एका ओळीचा आहे. प्राथमिक तपासानुसार, धमकीचा ई-मेल आसाममधील एका व्यक्तीने पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या ईमेलमध्ये धमकी देणारं एक वाक्य लिहिण्यात आलं आहे. तसंच हा ईमेल उत्तर-पूर्वेकडील राज्यातून पाठवण्यात आला असल्याची माहिती आहे. आता दिल्ली पोलीस याबाबत अधिक तपास करत असून ही धमकी देणार्‍याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसनेही या सर्व प्रकारावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटलंय की, ‘या प्रकरणाकडे गंभीरपणे पाहायला हवं. याअगोदर आपण हल्ल्यांमध्ये आपले दोन पंतप्रधान गमावले आहेत. तसंच छत्तीसगडमध्ये काँग्रेसने आपल्या आघाडीच्या नेतृत्वाची संपूर्ण फळीच गमावली आहे.’