Breaking News

मोहटागडावर नतमस्तक होऊन डॉ. विखे पुन्हा सक्रिय; जनसंघर्ष यात्रेनंतर जनसंवादाचा


पाथर्डी प्रतिनिधी

जनसंघर्ष यात्रेच्या ऐतिहासिक सभेनंतर डॉ. सुजय विखे यांनी तालुक्यात दाखविलेली सक्रियता लक्षवेधी ठरली आहे. सोमवारी श्रीक्षेत्र मोहटादेवीचे आशिर्वाद घेऊन ते पुन्हा सक्रिय झाले असून गावात दिलेल्या भेटी आणि नागरिकांशी साधलेला संवाद आगामी लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 

डॉ. विखे यांनी राजकीय विचारांतून जनसंघर्ष यात्रेच्या उतर महाराष्ट्राच्या दुसर्‍या टप्प्याचा समारोप पाथर्डी येथे केला. या सभेच्या निमित्ताने झालेले शक्‍तीप्रदर्शन हे काँग्रेस नेत्‍यांच्‍या डोळ्यात अंजन घालणारे ठरले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत सुरू झालेल्या विचारमंथनची चर्चा जोर धरून असतानाच डॉ. विखे यांनी दोन दिवसांपासून दक्षिण भागात सुरू केलेले दौरे राजकीय दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. रविवारी पारनेर तालुक्यातील विविध गावात विकास कामांचा शुभारंभ आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत उमेदवारी संदर्भात केलेले सूचक वक्तव्य चर्चेचा विषय ठरला असताना सोमवारी पाथर्डी तालुक्यात त्यांनी ग्रामस्थांशी साधलेला संवाद लक्षवेधी ठरला आहे. 

सोमवारी सकाळी डॉ. विखे यांनी श्रीक्षेत्र मोहटादेवीचे दर्शन घेतले. विश्वस्त मंडळाने केलेल्या सत्काराचा स्विकार करून नवरात्र उत्सवानिमित्ताने डॉ. विखे फौंडेशनच्यावतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास त्यांनी भेट दिली. डॉक्‍टर या नात्याने त्यांनी काही रुग्णांची विचारपूस केली. सुसरे येथे श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमास डॉ. विखे यांनी उपस्थिती दर्शविली. 

याप्रसंगी युवराज नरवडे, प्रसाद दराडे, गोरक्षनाथ ओव्‍हळ, रामदास पालवे, डॉ. हर्षवर्धन पालवे, अरुण वहिफळे, सुरेश भणगे, अविनाश फुंदे, विक्रम दहिफळे, महादेव दहिफळे, अक्षय आव्‍हाड, मोहनराव पालवे, संभाजी वाघ, पांडुरंग सोनटक्‍के, अजय रक्‍ताटे, बबनराव सबलस, प्रकाश शेलार, लाला शेख, विवेक देशमुख, विश्‍वनाथ मोरे, अविनाश कुटे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आखेगाव येथे वीज पडून झालेल्या दुर्घटनेत दादासाहेब चंद्रभान पायघन आणि जनार्दन दामोदर खेरचंद या दोन व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटूबियांची डॉ. विखे यांनी सांत्वनपर भेट घेतली आणि कुटुंबियांना दिलासा दिला.