Breaking News

बालकिर्तनकार प्रकाश महाराज फङ यांना महात्मा गांधी सेवा गौरव पुरस्कार


परळी (प्रतिनिधी)- वर्धा येथील बाबुलालजी अग्निहोत्री इंजिनिअरिंग कॉलेज परिसर बायपास नागठाणा वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त व एकता सेवाभावी संस्थांच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा गांधी विचार मंथनच्या संयुक्त विद्यमाने वारकरी संप्रदायातील ह.भ.प. बालकिर्तनकार प्रकाश महाराज फङ विद्यार्थी ज्ञानाई गुरुकुल सेलू यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफल पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. ह.भ.प. भगवताचार्य तुकाराम महाराज मुंडे शास्त्री झी टॉकीज फेम (मनमंदिरा) यांना ही महात्मा गांधी सेवा गौरव पुरस्कार जाहिर झाला असून परंतू प्रकृती अस्वस्थामुळे मुंडे महाराज वितरण सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने ह.भ.प.बालकिर्तनकार संग्राम महाराज फड यांनी स्विकारला. राष्ट्रीय एकात मताची शपथ सर्व पुरस्कार मान्यवरांना सेवाग्राम येथे पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी दिली.