Breaking News

इमदादुल उलुम प्राथमिक शाळेत वाचन प्रेरणा दिन


परळी,(प्रतिनिधी): दिनांक १५.१०.२०१८ रोजी इमदादुल उलुम प्राथमिक शाळेत भारताचे माजी राष्ट्रपंती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांमध्ये वाचन संसकृती रुजावी तसेच डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचे विचार, त्यांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठणाने करण्यात आली. वाचन प्रेरणा दिवस या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शाळेचे सिनिअर शिक्षक शेख इलियास अली महेमुद अली यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढावी यासाठी अनेक उपाय सुचविले तसेच शाळेचे आझाद नगर विभागाचे इन्चार्ज शेख अतीक उर रहेमान अब्दुल हमिद यांनी आपल्या भाषणात सांगितले की,विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक विकास आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी पुस्तकांचे वाचन अत्यंत गरजेचे आहे आणि शाळेच्या ग्रंथालयात चांगले पुस्तक उपलब्ध करुन दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शेख इनायत अली महेमुद अली यांचे आभार व्यक्त केले.