संभाजी ब्रिगेड उत्तरजिल्हाध्यक्ष पदी मच्छिंद्र गुंड पाटील यांची नियुक्ती


राहुरी/प्रतिनिधी
राहुरी येथे संभाजी ब्रिगेड चे प्रदेश महासचिव शिवश्री सौरभदादा खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रदेश संघटन सचिव शिवश्री डॉ संदिपजी कडलग, नाशिक विभागीय अध्यक्ष शिवश्री प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली, या बैठकी मध्ये अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष नियुक्ती, उत्तर नगर जिल्ह्यात संघटन बांधणी व आगामी लोकसभा निवडणुकां बाबत चर्चा झाली. या प्रसंगी अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवश्री टिळक भोस, अहमदनगर महानगर अध्यक्ष शिवश्री गणेश गायकवाड, राहुरी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र गुंड, राहाता तालुकाध्यक्ष शिवश्री साहेबराव इंद्रभान कुदळे, संगमनेर तालुकाध्यक्ष शिवश्री मंजाबापू गुंजाळ, अकोले तालुकाध्यक्ष शिवश्री चैतन्य पांगरे उपस्थित होते. 

या प्रसंगी सर्वानुमते राहुरीचे शिवश्री मच्छिंद्र गुंड पाटील यांच्या आज पर्यंत च्या कार्याची दखल घेऊन त्यांची संभाजी ब्रिगेडच्या अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली, आगामी लोकसभा निवडणुका व संघटन बांधणी यावर सविस्तर चर्चा झाली. संभाजी ब्रिगेड हि गेल्या वीस वर्षा पासून सामाजिक संघटना म्हणून काम करत आहे, गेल्या दोन वर्षांपासून संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष म्हणून पुढे आली आहे. आता पर्यंत राज्यात झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका नुसत्या लढविल्या नाही तर त्यात यश देखील संपादन केले. संभाजी ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष शिवश्री मनोज दादा आखरे, प्रदेश महासचिव शिवश्री सौरभदादा खेडेकर यांनी विधानसभेसाठी 100 तर लोकसभेसाठी 30 मतदार संघ निश्‍चित केले आहेत. या मध्ये अहमदनगर उत्तर मधील शिर्डी लोकसभा मतदार संघ हा देखील संभाजी ब्रिगेड मोठ्या ताकदीने लढविणार आहे असे जाहिर केले. या प्रसंगी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शिवश्री मच्छिंद्र गुंड पाटील म्हणाले की प्रदेश संघटन सचिव शिवश्री डॉ संदिपजी कडलग व नाशिक विभागीय अध्यक्ष शिवश्री प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकार्यांना सोबत घेऊन पुढील काळात शिर्डी लोकसभा मतदार संघात संभाजी ब्रिगेड गाव तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता हि संकल्पना राबवून संघटना बांधणी करणार व आगामी लोकसभा निवडणुकीत पुर्ण ताकदीने उतरणार आहे. या प्रसंगी शिवश्री विठ्ठल बोरूडे, रविंद्र बोरूडे, डॉ दत्तात्रय धोंडे, नुराभाई पठाण, सुनिल तनपुरे, हरीभाऊ वराळे, किशोर म्हसे राजेंद्र खोजे, संतोष वाघमारे, संजय संसारे ,नरेंद्र शेटे, बाळासाहेब कटारनवरे , रविंद्र तनपुरे, अक्षय तनपुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget