Breaking News

आर्थिक विवंचनेतून तरुणाची आत्महत्या


शिरूर,(प्रतिनिधी): शहरातील एका तरुणाने आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.३० च्या दरम्यान घडली आहे.प्रकाश आश्राजी चव्हाण वय ३५ या तरुणाने हाताला काम नाही आणि महागाईचा भड़का यामुळे घरखर्च भागत नसल्याने आर्थिक विवंचनेतून आपल्या राहत्या घरी टॉवेलच्या सहाय्याने अँगलला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.त्याच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा आहे.बहिन सुनंदा पवार हिने दिलेल्या खबरीवरुन शिरूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.