Breaking News

चोंडी कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीसाठी १० लाखांचा निधी मंजूर


जामखेड ता. प्रतिनिधी 

तालुक्यातील देवकरवाडी (चोंडी) येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीसाठी अल्पसंख्यांक निधीतून दहा लाख रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 

पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या चोंडी गावच्या अंतर्गत येणाऱ्या देवकरवाडी येथे मुस्लिम समाजाचे पंधरा ते वीस कुटूंबे वास्तव्यास आहेत. कब्रस्तानसाठी वाॅल कंपाऊंड असावे, ही मागणी मुस्लिम समाज बांधवाकडून सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानसाठी अल्पसंख्यांक निधीतून दहा लाख रुपये खर्चाच्या वाॅल कंपाऊंडच्या कामास मंजुरी मिळवली. मागील दोन दिवसांपूर्वी या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. 

दरम्यान, मुस्लिम कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीसाठी दहा लाख रूपयांचा निधी मंजुर करून दिल्याबद्दल चोंडी येथील मुस्लिम समाजाच्यावतीने पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा मुस्लिम समाजाच्या पारंपारिक पद्धतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती सुभाष आव्हाड, भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, जावेद शेख, अशोक देवकर, पापा शेख, हसन शेख , यासीन शेख, फय्याज शेख, पांडुरंग उबाळे, सोमनाथ पाचारणे आदी उपस्थित होते.