Breaking News

वसाका ऊस वाहतुकीचे थकीत बील त्वरीत द्या; अन्यथा कारखान्यासमोर उपोषणाचा इशारा....
कळवण प्रतिनिधी-विठेवाडी ता.देवळा येथील वसंतदादा पाटील सहकारी साथर कराखान्यास सन 2012-2013 या कालावधित केलेल्या ऊस वाहतुकीचे बील त्वरीत अदा करुन ट्रकमालकांची उपासमार टाळावी अन्यथा कारखान्यासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा ट्रक मालकांनी दिला आहे.
यासंदर्भात कळवण तालुका ट्रक मालक असोसिएशनच्या वतीने वसाकाच्या प्राधिकृत मंडळाकडे व प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की,सन 2012-2013 या कालावधीत वसंतदादा पाटील सगकारी साखर कारखान्यास ऊस वाहतुक केली असुन कारखान्याला नेहमीच सहकार्य केले आहे.मात्र या कालावधीतील ऊस वाहतुकीचे बील थकलेले असुन या बीलाबाबत कारखान्याचे संबंधित पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी वारंवार भेटुन आमचे म्हणणे मांडले आहे.परंतु प्रत्येक वेळी थातुरमातुर,उडवाउडवीचे उत्तर देवुन आमची बोळवण केली आहे.आम्ही हातावर काम करणारे कामगार असुन त्यात आमच्यावर बँकेचे कर्ज थकले आहे.सदर बील न मिळाल्याने हलाखीची परिस्थिती निर्माण झाली असुन बीलाची रक्कम दि.15 नोव्हेंबर 2018 पर्यंत प्राप्त न झाल्यास कारखान्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर कळवण तालुका ट्रक मालक असोसिएशनचे अध्यक्ष योगेश पगार,उपाध्यक्ष संदिप पगार,सचिव अनिल पगार,सहसचिव रामदास आहेर,खजिनदार अफजल पठाण,सदस्य सुरेश पगार,अाप्पाजी पगार,सल्लागार काकाजी पगार,नंदकिशोर शिरोरे,दिलिप पगार,शेख शाकिर अहम्मद,आतिक शेख,राजेंद्र पगार,दादाजी पगार,मिनाज शेख,योगेश शिरसाठ,मुन्ना शिरसाठ,दत्तात्रेय शिरसाठ,मोतिराम देवरे,रविंद्र देवरे,अरुण शिंदे,दिनानाथ शिरसाठ,साहेबराव शिरसाठ,निंबा सोनवणे,समीर मन्सुरी,गणेश भामरे,वामन ह्याळीज,वसंत बागुल,रज्जाक शेख,शरद जगदाळे,संजय रौंदळ,रशीद मन्सुरी,अनिल रौंदळ,बाळासाहेब बोरसे,नानाजी मोरे,श्रीकृष्णा वाणी,रामदास कानडे आदींच्या सह्या आहेत.