Breaking News

केरळच्या माजी मुख्यमंत्र्यावर लैंगिक शोषणाचे आरोप


तिरुअनंतपुरम : सध्या देशभरात ‘मी टू’ची चळवळ गाजत असताना आता केरळमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांनी आपले अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक शोषण केल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. याविरोधात केरळ पोलिसांनी शनिवारी रात्री ओमान चंडी यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला. केरळमधील सौरउर्जा घोटाळ्याशी याप्रकरणाचा संबंध आहे. या घोटाळ्यातील आरोपी महिलेला 2013 मध्ये ओमान चंडी यांनी सरकारी निवासस्थानी बोलवून घेतले. तेथे आल्यानंतर ओमान चंडी यांनी या महिलेला तिच्या उद्योगाला अभय देईन, असे सांगितले. त्या मोबदल्यात चंडी यांनी तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. यानंतर चंडी यांनी आपले अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक शोषण केल्याचे महिलेचे म्हणणे आहे.