Breaking News

सत्यजित तांबे यांना अटक करण्याची भाजप मागणी


।संगमनेर/प्रतिनिधी।

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह एका पेट्रोल पंपावर सत्यजित तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला काळे फासल्याच्या निषेधार्थ आज, दि. १२ संगमनेर भाजपतर्फे उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले. सत्यजित तांबे यांच्यासह काँगेस कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राम जाजू, काशिनाथ पावसे, राजेंद्र सांगळे, सुधाकर गुंजाळ, वाल्मिक शिंदे, नानासाहेब खुले, दिनेश सोमाणी, सुदाम ओझा, शिरीष मुळे, सीताराम मोहरीकर, केशव दवंगे, दीपक भगत, विकास गुळवे, लहानू नवले, अरुण थिटमे, दीपेश ताटकर, किशोर गुप्ता, शिवकुमार भांगीरे, भारत गवळी, जग्गू शिंदे, राहुल भोईर, राजेंद्र देशमुख, मनोज जुंदरे, वैभव लांडगे, दीपक थोरात, गोरक्ष कापकर, योगेश भोर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दि. ११ रोजी येथील एका पेट्रोल पंपावर समर्थकांसह जाऊन त्याठिकाणी असलेल्या फलकावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर काळे ऑइल ओतून प्रतिमेचे विद्रूपिकरण केले. सार्वजनिक ठिकाणी व शासकीय मालमत्ता असलेल्या फलकाची नुकसान केली. जगात देशाची मान उंचाविणार्‍या देशाच्या पंतप्रधांनाच्या प्रतिमेचे विद्रूपिकरण करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे. यासंदर्भात सत्यजित तांबे व त्यांच्या त्याच्या समर्थकांवर गुन्हा दाखल झालेला असूनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे याप्रकरणातील सर्व आरोपींना त्वरित अटक करावी अशा मागणी यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली.