Breaking News

माणूसकीचे नाते जपणार्‍यांचीच हज यात्रा सार्थकी; मुस्लिम धर्माचे धर्मगुरू मौलाना याहीया यांचे प्रतिपादन


राहाता : शांतता मानवता याची जोपासना करताना आपल्याकडून दुसर्‍याला दुःख अथवा त्रास होणार नाही याची काळजी घेत एकमेकातील आपुलकी प्रेम सहानुभूती व माणुसकीचे नाते जपून स्वच्छ नियत बाळगणार्‍यालाच खरा हाजी असतो त्याचीच उमरा अथवा हज यात्रा सार्थकी होते असे प्रतिपादन मुस्लिम धर्माचे धर्मगुरु मौलाना याहीया यांनी केले.

रा हज यात्रेसाठी जाणार्‍या 48 यात्रेकरूंचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापु कोते गणेशचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ साई निर्माण ग्रुप चे अध्यक्ष विजयराव कोते अ‍ॅड. रघुनाथ बोठे डॉ. संतोष मैड प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे प्रेस क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक सतीश वैजापूरकर नगरसेवक साहेबराव निधाने प्रशांत दंडवते डॉ बापूसाहेब पानगव्हाणे दशरथ तुपे नगरसेवक सलीम शहा मुस्ताक शाह चालक-मालक संघटनेचे अन्वर शेख साई निर्माण ग्रुपचे पंकज लोढा शिर्डी नगरपंचायत चे गटनेते अशोक गोंदकर नगरसेवक मंगेश त्रिभुवन संजय गोंदकर धनंजय साळी डी डी पवार राष्ट्रवादीचे सरचिटणीस शशिकांत लोळगे मौलाना याहिया मौलाना रऊफ आझाद मौलाना युसूफ शहा मौलाना इब्राहिम मौलाना अल्ताफ मौलाना लतीफ मुफ्ती नईम हाजी करीम शहा माजी नगरसेवक हाजी रफिक(बाबा) भाई शाह इकबाल मणियार हाजी जमील शाह हाजी शफिक शाह हाजी अफजलभाई गिरणी वाले अलीम हाजी रज्जाक शाह युनुसभाई पठाण हाजी फारुखभाई हजी मन्सूर भाई हाजी हाजी कादर शहा इसाकभाई पठाण हाजी सत्तारभाई इनामदार इलियास शेख हाजी मन्सूर सय्यद हाजी शाह मौलाना रफिक मौलाना अकील आदी मान्यवर उपस्थित होते

शिर्डी नगरीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापु कोते याप्रसंगी बोलताना म्हणाले की जात आणि धर्म वेगवेगळे असले तरी अल्ला आणि ईश्‍वर एकच असल्याने आपण एकमेकात दुजाभाव न करता मानवता हाच धर्म मानून आपण सर्वजण या देशाचे भारतभूमीचे लेकरे आहोत हा विचार घेऊन भविष्यकाळात समाज उन्नती करण्यासाठी वाटचाल करावी असे कोते यांनी सांगितले. साई निर्माण ग्रुप चे अध्यक्ष विजयराव कोते याप्रसंगी म्हणाले की हज यात्रा करून आलेला प्रत्येक व्यक्ती पवित्र स्थळी जाऊन आलेला असतो त्याने सत्कर्म करूनच हे पुण्य पदरी मिळवलेली असते हाजी मुन्नाभाई शहा व हाजी रफिक भाई शहा यांनी ना नफा ना तोटा या उद्देशाने या भक्तांची हज यात्रा घडवून आणली आहे त्यांच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अ‍ॅड. रघुनाथ बोठे मुकुंद सदाफळ साहेबराव निधाने पत्रकात रामकृष्ण लोंढे जेष्ठ पत्रकार सतीशराव वैजापूरकर शशिकांत लोळगे आदींची भाषणे झाली आयोजकांच्या वतीने बोलताना हाजी मुन्नाभाई शहा यांनी सांगितले की प्रत्येक धर्मात धार्मिक यात्रेला मोठे महत्त्व असून ते पवित्र कर्म समजले जाते याच उद्देशाने समाज बांधवांना यात्रा करता यावी म्हणून ना नफा ना तोटा या तत्त्वावर मी व माझे सहकारी मुजाहिद व तोहसिफ यांनी मिळून या लोकांची यात्रा घडवून आणली असून या कार्याला परमेश्‍वराचा आशीर्वाद व आपणा सर्वांची साथ आहे म्हणून हे शक्य आहे आम्ही फक्त निमित्तमात्र आहोत असे हाजी मुन्नाभाई शहा यांनी सांगितले.

बंधुभाव व परस्पर सामजंस्य आवश्यक 
मौलाना याहीया म्हणाले की समाज व देशाची प्रगती करायची असेल तर बंधुभाव व परस्पर सामंजस्य असणे आवश्यक आहे तरुण पिढीवर चांगले संस्कार करून जबाबदार नागरिक घडविणे सर्वांची जबाबदारी आहे उमरा किंवा हज यात्रा करून आलेल्या यात्रेकरूंनी नेहमी स्वच्छ नियत ठेवत समाज गाव आपला परिसर देश यासाठी चांगले कार्य करणे जरुरीचे आहे स्वतःमध्ये मानवता शांतता माणुसकी रुजवून गोरगरीब व वंचितांसाठी मदत करणे महत्त्वाचे आहे आपल्यामुळे समाजाला मानवतेला कुठलेही दुःख व त्रास होणार नाही याची काळजी घेणे जरुरीचे आहे सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व नियतीने पार पाडतो तोच खरा हाजी मानावा असे त्यांनी सांगितले.