Breaking News

जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कुलच्या अध्यक्षपदी शहादेव वंजारे


बीड (प्रतिनिधी)- बीड जिल्हा मोटार ड्राव्हींग स्कुलच्या सर्व संचालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी संचालक मंडळाचे संजय काळसे व लक्ष्मण घोरड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी शहादेव वंजारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. व उपाध्यक्षपदी जाकेर पाशा मोमीन रजियोद्दीन यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल शहादेव वंजारे यांचे मित्रपरिवाराच्यावतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.