Breaking News

खो-खो स्पर्धेत बीडच्या मुला-मुलींच्या संघास विजेतेपद


बीड, (प्रतिनिधी)- औरंगाबाद येथे झालेल्या १७ वर्षे वयोगटातील विभागीय खो-खो स्पर्धेमध्ये मुलांच्या सहा तर मुलींच्या सहा संघांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत मुलांचा अंतिम सामना औरंगाबाद शहर विरुद्ध बीड असा झाला. यामध्ये बीड संघाने औरंगाबाद संघावर एक डाव चार गुणांनी मात करत विजय मिळवला. मुलींच्या गटात अंतिम सामना औरंगाबाद शहर विरुद्ध औरंगाबाद ग्रामीण असा झाला. या सामन्यात औरंगाबाद शहर संघाने औरंगाबाद ग्रामीण संघावर एक डाव एक गुणांनी विजय मिळवला. या अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून रामप्रभू काकडे, अजय जोशी, प्रा. अंकुश गव्हाणे, चंदू सोनवणे, विजय जाहेर, विशाल जगताप, वर्षा कच्छवा, ओंकार महाडिक, संदीपान हंगे, प्रवीण मंडलिक, मच्छिंद्र भापसे यांनी निःपक्षपातीपणे निर्णय देऊन काम पाहिले. या विभागीय स्पर्धेत स्पर्धा व तांत्रिक समिती प्रमुख म्हणून प्रा. डॉ. तानाजी आगळे आणि प्रा. चित्रा घोरपडे यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, अजय पवार, संतोष वाबळे, बीड जिल्हा खो - खो असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.