Breaking News

परिवर्तनाच्या कथा सांगणार्‍या लोकराज्यच्या अंकाचे प्रकाशन

सातारा (प्रतिनिधी) : ऑक्टोबर लोकराज्य विशेषांक परिवर्तनाच्या कथा सांगणारा, विशेषतः महिलाना प्रेरणा देणारा आहे. अशा कथा मधूनच परिवर्तनाचे बीज रोवले जाते. हा अंक उद्यमशील असलेल्या प्रत्येकाने वाचावा असाच आहे. त्यामुळे तो अधिकाधिक लोकांनी वाचावा, असे आवाहन सातार्‍याच्या जिल्ह्याधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.

माहिती व जनसंपर्क विभागाकडून ऑक्टोबरमध्ये काढलेला महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा या लोकराज्य अंकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, नितीन थाडे उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा या यशकथांवर आधारित विशेषांकाची निर्मिती करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे या विशेषांकाचे अतिथी संपादक असून यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींच्या जीवनावर विशेष लेख लिहिला आहे. या अंकात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या माहिती कार्यालयांद्वारे संशोधन करून लिहिलेल्या यशकथा, उद्योजकता विकास, महिलांचे आर्थिक बळकटीकरण या विषयांवरील लेख, यशोगाथा व नावीन्यपूर्ण उपक्रम, विविध शासकीय योजनाबाबत माहिती देण्यात आली आहे. यात सातारा जिल्ह्यातील भगिनीचीही यशकथा प्रसिध्द केली आहे. समाजातील विविध घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून, त्यांच्या जीवनमानात बदल झाला आहे. अशा बदलांना टिपणारा लोकराज्यचा ऑक्टोबर महिन्याचा हा अंक आहे. अंकात वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:च्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणार्‍या राज्यातील विविध भागतील नागरिकांच्या यशकथांचा समावेश केला आहे. आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवणार्‍या या यशकथा प्ररेणादायी व उत्साह वाढणार्‍या आहेत. तरी जास्तीत-जास्त नागरिकांनी महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा या लोकराज्य अंक वाचावा, असे आवाहन सिंघल यांनी केले.