Breaking News

शहरातून जाणार्‍या रस्त्याच्या मागणीसाठी-गोले पाटील यांचे अन्नत्याग अंदोलन


माजलगाव(प्रतिनिधी) :- माजलगाव शहरातून जाणारा खामगाव-पंढरपूर रस्ता हा माजलगाव तालुक्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून हा प्रश्न लवकर मार्गी लागून शहरातून जाणारा रस्ता १०० फुटाचाच झाला पाहीजे या मागणीसाठी काल दिनांक ७ ऑक्टोबर रविवार रोजी पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होऊ घातलेल्या अन्नत्याग आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने त्यांनी चिंचगव्हाण येथील ’बळीराजा निवास’ येथे अन्नत्याग आंदोलन शेतकरी कामगार पक्षाचे भाई ऍड.नारायण गोले पाटील यांनी सुरु केले आहे. माजलगाव शहरातून जाणारा खामगाव-पंढरपूर रस्ता हा माजलगाव तालुक्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून या प्रश्नावर माजलगाव तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते,पत्रकार बांधव यांनी आनेक मार्गाने आंदोलने केले.