Breaking News

परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी


परळी, (प्रतिनिधी)- परळी-अंबाजोगाई रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून या रस्त्यावर दररोज छोटे मोठे अपघात होत असून प्रवाशांची हाडे खिळखिळी होत आहेत. राज्य परिवहन महामंडळाने याची त्वरित दखल घेवून या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी व या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. 

गेल्या वर्षापासून परळी-अंबाजोगाई रस्त्यावर रूंदीकरणाचे काम धिम्या गतीने चालू असल्यामुळे प्रवाशांना अत्यंत त्रास होत आहे. परळी-अंबाजोगाई मार्गावर जातांना प्रवाशांना जादा वेळ लागत असून वाहनाची खराबी होत आहे. लांब पल्ल्याच्या बसेस रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत परळी, टोकवाडी, नागापुर, दौनापुर, साकुडमार्गे किंवा घाटनांदुर मार्गे अंबाजोगाई या मार्गाने सोडाव्यात अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.. परळी अंबाजोगाई मार्गावरील वाहतुक अन्य मार्गाने वळवावा हा रस्ता परळी-अंबाजोगाई रस्त्यापेक्षा अतिशय चांगला असून कमी वेळामध्ये अंबाजोगाईला पोहचता येईल असे सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांनी सांगितले.

जर वेळीच तहसील प्रशासनाने रस्ता दुरुस्तीसाठी दलख न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही सौंदळेसह ग्रामस्थांनी दिला आहे.