Breaking News

आदित्य औषधी विद्यालयाच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन


बीड, (प्रतिनिधी):- आदित्य औषध महाविद्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासुन विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सुशिक्षित स्टाफ नसल्याचे म्हटले आहे. तसेच विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त व्हावे लागत आहे. कॉलेजमध्ये अभ्यासिका होत नाही. तसेच कुठल्याही सुविधा उपलब्ध होत नसल्याने काल विद्यार्थ्यांनी जिल्हाकचेरीसमोर आंदोलन करुन कॉलेज प्रशासनाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

महाविद्यालयात शिकवण्यासाठी सुशिक्षित प्राध्यापक नाही तसेच पीएचडी झालेला प्राचार्यही नसल्याने तो उपलब्ध करुन द्यावा, कॉलेजमध्ये अभ्यासिका वर्ग भरवण्यात यावेत तसेच विद्यार्थ्यांची मॅनेजमेंटकडून होणारी लूट थांबवावी, महाविद्यालयातील कॅश काउंटरचा घोळ थांबवण्यात यावा, २०१७ सालचे डॉ.पंजाबराव देशमुख योजनेचे पैसे मिळाले नाहीत ते देण्यात यावे यासह विविध मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असुन आदित्य औषधी महाविद्यालयाचा सावळा गोंधळ विद्यार्थ्यांनी उघड पाडला आहे