Breaking News

पोलीस कोठडीतून आरोपी फरार


पुणे : पुणे ग्रामीणमधील खेड पोलीस ठाण्याच्या सबजेलमधील खिडकीचे लोखंडी गज कापून दोन आरोपींनी पलायन केल्याची घटना समोर आल्यानंतर गार्ड कमांडर कैलास कड यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर, इतर तीन पोलीस कर्मचाऱयांच्या विभागीय चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत. 

गार्ड कमांडरवर पोलीस कोठडीची जबाबदारी असल्याने कड यांचे तातडीने निलंबन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. कोठडीच्या बाहेरून आरोपींना त्यांच्या साथीदारांनी मदत केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. विशाल दत्तात्रय तांदळे आणि राहुल देवराम गोयेकर अशी या फरार आरोपींची नावे आहेत.