Breaking News

कम्युनिस्टांचा मोर्चा पोलिसांनी रोखला


मुंबई : ‘मोदी हटवा, संविधान वाचवा’ असा नारा देत कम्युनिस्टांच्या मोर्चासाठी राज्यभरातून कार्यकर्ते दाखल झाले आहेत. मोर्चाला असलेल्या परवानगीच्या मुद्द्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. तर मोर्चा मंत्रालयावर नेण्याचा निर्धार कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. रोजगार निर्मिती, काळा पैसा, राफेल करार, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या या मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे कम्युनिस्ट नेते रेड्डी यांनी सांगितले. 

भाजपने लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांचा विसर पडल्याचा आरोप कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी यांनी केला. दोन कोटी रोजगार निर्मिती, काळा पैसा, राफेल करार, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या या मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे कम्युनिस्ट नेते रेड्डी यांनी सांगितले.