Breaking News

मुख्य जलवाहिनीला गळती, लाखो लिटर पाणी वाया


सातारा (प्रतिनिधी) : नगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाहतूक शाखेनजीकच्या मुख्य रस्त्यावरील जलवाहिनीला अंतर्गत गळती लागल्याने बुधवारी सकाळपासून लाखो लिटर पाणी वाया गेले. या गळतीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

पोवई नाक्यावर सुरु असणार्‍या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे नाक्याकडून राजवाड्याकडे जाणार्‍या रस्त्यावरील एकेरी वाहतूकीच्या प्रचंड ताणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या महिला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारानजीकच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या अंतर्गत जलवाहिनीला अंतर्गत गळती लागल्याने बुधवारी सकाळी येथे सुरु असलेल्या गळतीने लाखो लिटर पाणी वाया गेले. या परिसरातून पाण्याचे लोट वाहत होते. ज्या ठिकाणी ही गळती सुरु आहे त्याठिकाणी अंतर्गत मुख्य जलवाहिनी असल्याने ही गळती तातडीने काढणे गरजेचे आहे. 

या रस्त्यावर सध्या वाहतुकीची प्रचंड ताण असल्याने ही जलवाहिनी फुटली असावी. नगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालिकेच्या संबंधित विभागाकडून यावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे असताना पालिकेचा एकही कर्मचारी याठिकाणी फिरकला नाही. तातडीने या गळतीची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे