Breaking News

कार्यकारी अभियंता शिदेंची कार्यालय वार्‍यावर सोडून सहल; अभियंता दौर्‍यावर अन् डिव्हीजन सोडले वार्‍यावर


बीड (प्रतिनिधी)- येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे कार्याकारी अभियंता शिदें यांना कार्यालय सोडून घरीच काम करण्याचा पायंडा घातला असुन कार्यालयात कधीही शिंदे साहेबांचे हजर नसतात, त्यांची सर्व कामे घरीच होतात. त्यांचेकडे काही कामे असल्यास संबंधीत लोकांना त्यांना सापडावे लागत असल्याने सां.बा. मध्ये कामे करणार्‍या गुत्तेदारांना याचा त्रास होत असुन कर्मचारीही साहेब नसल्याने मेटाकुटीस आले आहेत. 

कार्यकारी अभियंता शिंदे यांचा कारभार म्हणजे अंधळ दळतय..अन्ं कुत्र पिठ खातय.. असा प्रकार येथील सां.बा.विभाग क्रमांक २ मधे पहावयास मिळत आहे. विविध कामांचा लेखा-जोखा विश्‍वासु लोकांवर सोपवुन साहेब नेहमीच दौर्‍यावर असातात. दौरा नेमका कोणत्या तालुक्यात, विभागात आहे त्याचे उत्तर येथील कर्मचार्‍याकडे उपलब्ध नसते. विकास कामांवर देखरेख करणे, गुणवत्ता तपासणे, कार्यालयात थाबुन सामान्यांच्या समस्या जाणुन घेणे असले प्रकार शिंदे साहेबांच्या अधिकार क्षेत्रात नाहीत का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कार्यालय वार्‍यावर सोडून सहलीवर फिरणे हे कितपत योग्य आहे असाही सुर कर्मचार्‍यात चर्चीले जात आहे.