Breaking News

कुंबेफळच्या रेणूताई कुदळे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची इंग्लिश विषयात पीएचडी


अंबाजोगाई (प्रतिनिधी)- नागझरी परिसरातील कै. दादाराव कराड माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका सौ. रेणुताई शिदलिंगआप्पा कुदळे यांना इंग्लिश विषयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएचडी मिळाली आहे.

त्या अंबाजोगाई तालुक्यातील मौजे कुंबेफळ येथील रहिवाशी असून सध्या अंबाजोगाईत वास्तव्यास आहेत. त्यांच्या निवडीचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, पत्रकार रोहिदास हातागळे , ललित झिरमले, अविनाश उगले, मिलिंद बाबजे, आदींनी त्यांचे अभिनंदन केले.