नाना पाटेकरांना महिला आयोगाची नोटीस


मुंबई : नाना पाटेकरांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही आहेत. तनुश्री दत्ताच्या तक्रारीची महिला आयोगाने दखल घेतली आहे. नाना पाटेकर, गणेश आचार्य, समीर सिद्दीकी, राकेश सारंग यांना महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. सविस्तर माहितीसाठी तनुश्री दत्ता यांना आयोगात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 10 दिवसात उत्तर देण्याचे आदेशही महिला आयोगाने दिले आहेत.

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने तात्काळ अंतर्गत तक्रार निवारण समिती (आयसीसी) स्थापन करण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. नाना पाटेकरांनी तनुश्रीच्या आरोपांचं खंडन केलं आहे. ती जे काही सांगतेय ते खोटं असल्याचं नानांनी म्हटलं होतं. नानांच्या वकिलांनी तनुश्रीला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. तनुश्रीने 2008 मधील ’हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते नाना पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये 2 गट पडले आहेत. काही जण नानांच्या बाजून आहेत तर काही तनुश्रीच्या बाजुने उभे आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget