Breaking News

आ.क्षीरसागरांच्या हस्ते काठोडा येथे ३ कोटीच्या रस्ते कामाची सुरूवात


बीड  (प्रतिनिधी) - तालुक्यातील काठोडा या गावी आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण काठोडा ते वांगी ६ किलोमिटर अंतराच्या रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले. हे काम ३ कोटी ६ लाख रूपयांचे आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास बडगे हे होते. प्रारंभी स्व.काकू-नानांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी दिनकर कदम, दिलीप गोरे, वैजीनाथ तांदळे, गणपत डोईफोडे, अरूण बोंगाणे, ऍड.राजेंद्र राऊत, जिवनराव बजगुडे, सचिन घोडके, अच्यूतराव शेळके, भास्कर शेळके, सुधाकर शिंदे, नानासाहेब जाधव, एम.जे. मोटे, बापूराव शेळके, अशोक देशमुख, सुनिल डोळस, गोवर्धन जगताप, महादेव निर्धार, सखाराम आखाडे आदि मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, काठोडा या ठिकाणी अरूण डाके यांच्या माध्यमातून गाव एकसंघ राहिलेले आहे. गावची कामे होण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो तो डाके नानांनी केल्यामुळे अनेक विकासाची कामे होऊ शकली. भवानवाडी, वांगी, इमामपूर या ठिकाणचे रस्ते देखील आगामी काळात पूर्ण होतील. अनेक गावांमधील विकास कामांचा आराखड्यात समावेश केला आहे त्यालाही मंजूरी मिळेल. प्रत्येक योजनेचा लाभ ग्रामीण भागात झाला पाहिजे यासाठी निधीची नितांत गरज असते. विकास कामे करून घेण्यासाठी समन्वय ठेवावा लागतो तरच निधी मिळतो. सध्या दुष्काळी परिस्थिती असून पाणी, जनावरांचा चारा आणि हाताला काम मिळालेच पाहिजे. शेतकर्यांच्या हितासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून काठोडा येथील सिंचन तलावाचा प्रश्‍न आपण मार्गी लाऊ, सत्ता असो किंवा नसो विकास कामांची गोरगरीबांसाठी ही नाळ जोडली आहे ती तोडणार नाही. भविष्यात अनेक योजना राबवायच्या आहेत सर्वांनी एकजूटीने राहावे असे ते म्हणाले. यावेळी बोलताना अरूण डाके यांनी आभार मानले. बीड जिल्हयाला दूरदृष्टी असणारा शांत, संयमी व सुस्वभावी गोरगरीब जनतेची कामे करणारा नेता हवा आहे हे सारे गुण आ.जयदत्त क्षीरसागर यांच्यात असल्यामुळे आजही ग्रामीण भागात त्यांच्याशी प्रचंड लोक जोडले गेलेले आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भागवत डाके, अविनाश डाके, केशव डाके, पांडूरंग डाके, सुंदर डाके, त्र्यंबक डाके, विठ्ठल डाके, हरीभाऊ गिते, सुंदर धकटे, लाला गित्ते, सत्तू गित्ते, चिंतामन मोरे, कल्याण ओहाळ, बुधा दुधाडमल, आश्रुबा ओहाळ, रावसाहेब वाघमारे, शशीकांत डाके, आण्णा डाके, भागवत डाके, मधूकर डाके, मधूकर ओहाळ, महादेव डाके, सोपान नाईकवाडे आदिंनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी काठोडा परीसरातील जवळपास ६ गावच्या ग्रामस्थांची उपस्थिती होती.