Breaking News

ईव्हीएम मशिनची प्रथमस्तरीय तपासणी सुरु


सातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यासाठी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी ईव्हीएम मशिन प्राप्त झालेल्या असून मशिनची साठवणूक एमआयडीसी सातारा येथील गोदाम क्र.3 येथे करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बेंगलोर येथील बीईएल कंपनीतून तज्ञ इंजिनइर यांचे पथक सातारा येथे दाखल झालेले आहे. ईव्हीएमची प्रथम स्तरीय तपासणी 12 ऑक्टोबरपासून एमआयडीसी, सातारा येथील गोदाम क्र.3 तेथे तज्ञ इंजिनियर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. प्रथमस्तरीय तपासणी करत्यावेळी मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्ष यांचे अधिकृत प्रतिनिधी यांना उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.
प्रथमस्तरीय तपासणीसाठी सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघातून 12 पथके गोदामामध्ये ईव्हीएम मशिनची प्रथमस्तरीय तपासणी करण्याकामी हजर राहून कामकाज सुरु केलेले आहे. प्रथम स्तरीय तपासणी करण्याकामी नोडल अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. गोदामामध्ये प्रथमस्तरीय तपासणीचे कामकाजावर उपजिल्हा निवडणूक अधिकारी पूनम मेहता यांचे संनियंत्रण राहणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रथमस्तरीय तपासणीचे काम गोदाम क्र.3 मध्ये सुरु असून त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच ईव्हीएम च्या प्रथमस्तरीय तपासणीचे काम संपेपर्यंत मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून शंकांचे निरसन करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.