Breaking News

पंढरपुरात दोन विद्यार्थीनींवर अत्याचार


पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात दोन वेगेवगळया घटनेत विद्यार्थींनीवर अत्याचाराच्या घटना घडल्या. तालुक्यातील सुपली गावात गुरू शिष्य नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शिक्षकानं विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नराधम शिक्षक नंदकुमार कोळवले हा विद्यार्थिनींशी गोड बोलत जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. याच पद्धतीने त्याने पीडित विद्यार्थिनीशी जवळीक साधली. शिक्षकाने या विद्यार्थिनीवर अत्याचार केले शिवाय विद्यार्थिनीसोबतचे फोटो समाजमाध्यमांमध्ये पसरवत बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. दुसरीकडे पंढरपुरातीलच गार्डी गावात नराधम राहुल फाटे या नराधम शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीला जवळ बोलावलं. मोबाईलमधील फोटो दाखवण्याच्या बहाण्याने नराधमाने विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचे प्रयत्न केले आहेत. पंढरपुरात एकाच दिवशी 2 घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
तर दुसर्‍या एका घटनेत शेजार्‍याने एका विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची ही घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून पंढरपूर हादरून गेले आहे. गार्डी येथील शाळेत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीवर शेजार्‍याने अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. राहुल फाटे या व्यक्तीने शेजारी राहणार्‍या या विद्यार्थीनीला शेतात बोलावून तिच्यावर अत्याचार केले. या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी या नराधमावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. दरम्यान, दोन्ही घटनांप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसांत पोस्कोसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणातील दोन्ही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.