Breaking News

भर दिवसा ५० हजार रुपये लंपास


बीड (प्रतिनिधी)- वाहतूक पोलीस कर्मचाजयासमवेत उभा राहिलेल्या शेतकजयाच्या दुचाकीच्या
डिक्कीतून रोख ५० हजार रुपयांची रक्कम लंपास केली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

रामहरी श्रीहरी हरणवाळ (३०, रा. थेटेगव्हाण, ता. धारुर) हे गुरुवारी दुपारी आपल्या भाच्यासमवेत बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका बँकेत आले. बँकेतून त्यांनी ५० हजार रुपये काढत ते दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. नगर रोडने जाताना त्यांना पोलिसांनी अडवले.दुचाकी दूर उभा करुन हरणवाळ हे वाहतूक पोलिसांसोबत बोलत उभे होते. याच दरम्यान पाळत ठेवून असलेले चौघे दुचाकीजवळ आले. निळ्या रंगाचा शर्ट घातलेला जाड व्यक्ती आडवा उभा राहिला तर दुसजया एका जणाने डिक्कीतील रक्कम काढून घेतली. तोपर्यंत तिसरा दुचाकीस्वार तेथे हजर झाला. त्याने रक्कम घेऊन आलेल्या चोरट्यास लिफ्ट देऊन पेट्रोल पंपाच्या दिशेने पलायन केले. निळ्या रंगाचा शर्ट घातलेला चोरटाही अवघ्या काही मिनिटात तेथून पसार झाला. परत आल्यानंतर हरणवाळ यांना पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. चोरटे कॅमेजयात कैद झाले आहेत.