अमृतसरमध्ये आंदोलनकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक


अमृतसर : अमृतसरच्या जोडा फाटकजवळ झालेल्या भीषण अपघातात 61 जणांच्या मृत्यूनंतर आंदोलनकर्त्या नागरिकांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली आहे. रविवारी पंजाब पोलिसांचं पथक रेल्वे रुळांवर आंदोलन करणार्‍यांना हटवण्यासाठी गेलं असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पंजाब पोलिसांचा एक जवान आणि एक पत्रकार जखमी झाला आहे. दरम्यान,या ठिकाणाहून आंदोलनकर्त्यांना हटवण्यात आलं असून अपघातानंतर या मार्गावरुन पहिली रेल्वे रवाना झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार सकाळपासून जोडा फाटकजवळ मृतांचे नातेवाईक आणि अन्य नागरिक आंदोलन करत होते. त्यावेळी स्थानिक अधिकारी आणि पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना तेथून हटवलं आणि पोलिसांची अतिरिक्त कुमक तेथे मागवण्यात आली आहे. दगडफेकीत पंजाब पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल अमृतपाल सिंह गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमृतसरमध्ये रावण दहन सुरु असताना जमलेले अनेक लोक रेल्वे रुळांवरही उभे होते. या सगळ्यांना चिरडून एक ट्रेन अत्यंत वेगात गेली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला. तर 51 लोक जखमी झाले. या घटनेने अवघा देश सुन्न झाला. रावण दहनाचे दृश्य मोबाइलमध्ये कैद करण्यातही शेकडो लोक गुंग झाले असतानाच जालंधरहून अमृतसरकडे वेगाने निघालेली गाडी या मार्गावरून धडाडत आली. फटाक्यांच्या आवाजात आणि प्रकाशात गाडीचे प्रखर दिवे आणि भोंगे कुणाला ऐकूही गेले नाहीत आणि क्षणार्धात लोहमार्गावर उभ्या असलेल्या लोकांना धडक देत गाडी वेगाने पुढे गेली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget