Breaking News

गांधी जयंतीनिमित्त सप्ताहाचे आयोजन


कुळधरण: प्रतिनिधी

येथील महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे सलग नवव्या वर्षी दि. १ ते दि. ८ या कालावधीत महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधीभवन, कोथरूड येथे होणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन युवक क्रांती दल यांनी केले आहे, अशी माहिती डॉ.कुमार सप्तर्षी यांनी दिली. यावेळी सहकार्यवाह अप्पा अनारसे, संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर आदी उपस्थित होते. या सप्ताह कार्यक्रमात कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शेतकरी सुकाणू समितीचे सचिव अजित नवले, आ. बच्चू कडू, स्वामिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर सहभागी होणार आहेत.