Breaking News

कसबे सुकेणे येथे किटकनाशकाचा बेकायदेशीरा साठा जप्तः माध्यम पातळीवर वाच्यता होऊ न देण्याची शिष्टाई


नाशिकः
मानांकित कंपन्याचे किटकनाशक घाऊकमध्ये साठा करून किरकोळ विक्री बेकायदेशीरपणे करणार्या कसबेसुकेण्याच्या दोन भामट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्याने नाशिक जिल्ह्यातील बागायतदारांमध्ये विशेषतः निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांमध्ये खळबळ उडाली आहे.दरम्यान यापैकी एक भामटा द्राक्ष बागायतदार संघाशी संबंधित एका प्रतिष्ठीताचा दिवटा पुञ असल्याने जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींनी या प्रकरणाकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ए.ए.आडसूळ आणि निफाड पंचायतीचे कृषी अधिकारी तथा गुणवत्ता नियंञण निरिक्षक बी.व्ही.खेडकर यांच्या सतर्कतेमुळे किटकनाशकांचा हा बेकायदेशीर व्यापार पोलीसांनी उध्वस्त केला.
या संदर्भात ओझर पोलीसांकडून प्राप्त माहीती अशी की,दि.४ आॕक्टोबर रोजी ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ए.ए.अडसूळ निफाड तालुक्यातील कसबेसुकेणे शिवारात संशयीत किटकनाशकाचा साठा असल्याची माहीती कृषी अधिकारी बी.व्ही.खेडकर यांना कळवून सदर किटकनाशकांची पडताळणी करण्याची विनंती केली.त्यानंतर खेडकर यांनी कसबे सुकेणे शिवारातील खोडे मळा येथे पञ्याच्या शेडमध्ये किटकनाशकांचा मोठा साठा असल्याचे लक्षात आले.या किटकनाशकांच्या पॕकींगवर उत्पादक कंपनी,उत्पादन तारीख,बॕच नंबर अशी तांञिक माहीती नसल्याने कृषी अधिकारी आणि पोलीसांचा संशय बळावला.त्यानंतर हा साठा सांभाळणारे विवेक वासुदेव काठे आणि अक्षय नामदेव लाखे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूध्द किटकनाशक पुरवठादाराचे नाव विचारले.हैद्राबाद येथील अल्पेश पटेल या इसमाकडून पुरवठि होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या तिघांविरूध्द विनापरवाना किटकनाशकांचा साठा करून विक्री करणे,शासन आणि शेतकर्यांची फसवणूक करणे आदी आरोपांवरून भादवि कलम ४२०,किटकनाशक कायदा १९६८ कलम१३,१७,१८, किटकनाशक नियम १९७१चे नियम १०,१५,१६,१८,१९,२० किटकनाशक आदेश १९८६खंड ४व५ अन्वये ओझर पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.
जप्त मालांत एलिएट,इमीडेक्लोरोप्राईड,नॕटीओ,टोपाझ,डायमेथोमाॕर्फ,थायमेथाॕक्सीन,मायकोबुटानी,मेटालक्झमी,काॕपरआॕक्झीक्लोराइड,सायमोक्झीमील,थायरोफोरेट मिथाईल,कोरोझेन,स्कोर असे विविध मानांकीत किटकनाशकांमधील घटक वेगळे करून विक्रीसाठी साठा केलेला तब्बल ६६६.३ किलोचा समावेश आहे.हैद्राबादचा अल्पेश पटेल आणि विवेक काठे,अक्षय लाखे मानांकीत किटकनाशकातील महत्वाचे वेगळे घटक वेगळे करून घाऊक प्रमाणात साठा करून शेतकर्यांना बेकायदेशीरपणे विक्री करीत होते.कंपनीकडून खारेदी केलेली नसल्याने शासकीय कर,जीएसटी बुडवून शासनाची आणि दुय्यम गुणवत्तेचा माल शेतकर्यांना स्वस्तात विकून शेतकर्यांची फसवणूक करीत होते.या रॕकेटमध्ये द्राक्ष बागायतदार संघाशी संबंधित एका प्रतिष्ठीताच्या दिवट्या पुञाचा संबंध सांगीतला जात असून पोलीस पातळीवर प्रकरण दडपण्यास अपयश आल्यानंतर माध्यमपातळीवर प्रकरण दडपण्याची शिष्टाई यशस्वी झाल्याची चर्चा आहे.