Breaking News

म.वि.प्र.च्या मोहपाडा आश्रमशाळेत वाचन प्रेरणादिन व हात धुवा दिन साजरा


मविप्र समाज संचलित अनुदानित आश्रमशाळा, मोहपाडा ता.सुरगाणा येथे वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिपक कणसे पाटील होते. शिक्षक सुनील कासार यांनी हात धुण्याचे महत्त्व व प्रात्यक्षिक दाखविले. ग्रंथालय विभाग प्रमुख नवनाथ ठाकरे यांनी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले. विद्यार्थांना अवांतर पुस्तकांचे वाचन करण्याची संधी व प्रेरणा मिळावी म्हणून वाचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम वाचन कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले.मुकेश दोंदे यांनी प्रेरणादायी असे फलक लेखन केले.कमल दळवी, चंदर कवर,दीपक अहिरे, नामदेव वाजे,सतीश शेळके आदी शिक्षकांनी 'मला आवडलेले पुस्तक' या विषयावर मनोगत व्यक्त करून वाचनाचे महत्त्व विशद केले. वाचन केलेल्या पुस्तकांच्या स्वतः नोंदी कराव्या तसेच वाचलेल्या आशयाचे चिंतन करावे, असे आवाहन नवनाथ ठाकरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संतोष गौळी, संतोष जाधव, मुकेश दोंदे,शैला हिरे, कैलास चौधरी, योगेश गोवर्धने,नितीन अहिरे,हेमंत ठाकरे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.