Breaking News

देवळा येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात पोलीस स्मृतीदिन साजरा


देवळा ( वर्ताहर ) येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात पोलीस स्मृतीदिन साजरा करण्यात आला . शेरी ता देवळा येथील पोलीस कर्मचारी बाळासाहेब सुखदेव गांगुर्डे हे भिवंडी येथे २००६ साली झालेल्या दंगलीत शहीद झाले .शहीद बाळासाहेब गांगुर्डे यांचे माध्यमिक शिक्षण खर्डे विद्यालयात झाल्याने दि २१ रोजी येथे पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या उपस्थितीत पोलीस स्मृतिदिन साजरा करण्यात आला. 

यावेळी शहीद गांगुर्डे यांची प्रतिमा त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करीत त्यांना मानवंदना देण्यात आली . याप्रसंगी  पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे मुख्याध्यापक आंबदास देवरे, रवी बर्वे, नंदू जाधव, माजी सरपंच नारायण जाधव, प्रहारचे कृष्णा जाधव ,मधुकर देवरे ,शिवसेनेचे विजय जगताप, ग्रामपंचायत पंचायत सदस्य राहुल देवरे आदींसह ग्रामस्थ, शिक्षक , पोलीस कर्मचारी उपस्थित होते .