Breaking News

चर्मकार समाजाला संघटीत करण्याचे काम बबनराव घोलप यांनी केले- विलास बामणे


बीड (प्रतिनिधी) राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी चर्मकार समाजाला संघटीत करुन न्याय देण्याचे काम केले असे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास बामणे यांनी केले. शहरातील पेठबीड भागातील रोहिदासनगर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी ७५ मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुढे बामणे म्हणाले की, समाजकल्याण मंत्री असताना बबनराव घोलप यांनी विविध योजना राबवून समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यांच्यामुळे समाजाचे विविध प्रश्न मार्गी लागले आहेत. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे त्यांचे राज्यभर काम सुरू असून जिल्ह्यातही समाजाला न्याय देण्याचे काम बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचेे सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, प्रदेश प्रवक्त रोहिदास बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू, होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी समाजसेवक प्रियंका डोईफोडे, लाड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष विलास बामणे, समाजसेवक प्रियंका डोईफोडे, लाड, पुरुषोत्तम भोसले, राजू उनवणे, शाम गायकवाड, मनोज कांबळे, मुंजा पानझडे, बाळासाहेब राऊत, संतोष मस्तुले, कृष्णमुनी कांबळे, आनंद कांबळे, अरुण कांबळे, बबन गायकवाड, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.