Breaking News

प्रवरेचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना


प्रवरानगर
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पाथरे येथिल श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विदयालय आणि लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयातील खेळाडू ड्रॉप रोबॉल या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पोखरा (नेपाळ) येथे रवाना झाले असल्याची माहिती संस्थेचे क्रीडा शिक्षक अफजल पटेल यांनी दिली.
दि ८ ते १२ आकटोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेमध्ये भारतासह श्रीलंका ,भुतान, नेपाळ, मलेशिया, चीन, मंगोरिया आदी जगभरातील आठ देशातील खेळाडू सहभागी होणार आहेत. ड्रॉप रोबॉल राष्ट्रीय स्पर्धा पाथरे येथिल श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विदयालयातीलविशाल आदिनाथ कराळे हा परभणी येथून आश्विन रावसाहेब राजगुरे आणि कु. प्रेरणा प्रकाश ब्राह्मणे झारखंड येथून तर रितेश नंदकुमार घोलप हा खेळाडू विशाखापट्टणम येथून खेळल्यानंतर या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तर, लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयातील कु. वैष्णवी परसराम विखे, कु. साक्षी रक्त्ताटे यांची ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघव्यवस्थापक भणगे, प्रशिक्षक भाऊसाहेब बेंद्रे, क्रीडाशिक्षक शशीकांत म्हस्के, मुख्याद्यापक भास्कर तांबे,लक्ष्मण एणगे, दादा मनतोडे यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
या खेळाडूंचे राज्याचे विरोधी पक्षनेते आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे चेअरमन ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील ,विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील,भाऊसाहेब चंद्रभान कडू माजी कुलगुरू आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, सचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर प्रा. विजय आहेर, यांनी अभिनंदन केले.