कोरेगावात साडेचार लाखांचा कोरेगावात साडेचार लाखांचा गुटखा जप्त


सातारा (प्रतिनिधी) : शुक्रवारी पहाटे कोरेगाव, पुसेगाव, रहिमतपूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई कोरेगाव तालुक्यातील शिरंबे गावाजवळ पोलिसांनी साडेचार लाखांचा गुटखा जप्त केला. यावेळी सर्वण बिष्णोई (मुळ रा. राजस्थान, सध्या रा. सातारा) याला अटक केली असून त्याच्याकडून चार लाखाचा गुटखा व एक स्कोडा कार पोलिसांनी जप्त केली.

शुक्रवारी पहाटे कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक कुंभार हे रात्रगस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एक स्कोडा कार संशयास्पदपणे फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्या कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने कार थांबवली नाही. कार पुसेगावच्या दिशेने गेल्याने कुंभार यांनी पुसेगाव पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

पुसेगावचे सपोनि विश्वजीत घोडके हे कारच्या पाळतीवर थांबले होते. काही वेळातच एक कार समोरून आल्याने त्यांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने कार पुन्हा कोरेगावच्या दिशेने वळवून पोलिसांना गुंगार दिला. 

दरम्यान, कोरेगाव पोलिसांची गाडी समोरून आल्याचे दिसताच चालकाने पोलीस गाडीला झासा मारून कार रहिमतपूरच्या दिशेने नेली. त्यानंतर कोरेगाव पोलिसांनी रहिमपतपूर पोलिसांना या कारची माहिती दिल्याने पोलीस उपनिरीक्षक जगदाळे कारच्या पाळतीवर थांबले होते. त्यांना पाहताच चालकाने कार शिरंबे गावात घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठे वळण असल्याने चालकाला अंदाज न आल्याने कार पलटी झाली. यावेळी कारमधील अन्य दोघे पळून गेले. तर सर्वण बिष्णोई याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता साडेचार लाखाचा अवैध गुटख्याचा साठा आढळला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget