‘शिर्डी’तून मातंग समाजाला उमेदवारी द्या : पोळ


कोपरगाव श. प्रतिनिधी 

अनुसूचित जातीतील १३ टक्क्यांमध्ये मातंग समाज आहे. याचे विविध राजकीय पक्षांनी भान ठेवून शिर्डी मतदार संघ अनुसूचित जाती करिता राखीव असल्याने या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून मातंग समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष विधीतज्ज्ञ नितीन पोळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. 

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की शिर्डी लोकसभा मतदार संघ अनुसूचित जाती करिता राखीव असून गेल्या दोन वेळेस या मतदार संघातून विविध राजकीय पक्षांनी प्रामुख्याने चर्मकार व बौद्ध उमेदवारांना प्राधान्य दिले होते मात्र राजकीय पक्ष निवडणुकांमध्ये मातंग समाजाचा वापर करून घेतो. मात्र मातंग समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे मातंग समाजाकडे विविध राजकीय पक्षांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. त्यामुळे समाजाचे प्रश्न इतर प्रतिनिधीकडून गांभीर्याने मांडले जात नाही. मातंग समाजाच्या विकासात हा मोठा अडथळा ठरत आहे. 

शिर्डी मतदार संघातील कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोला, नेवासा या तालुक्यात मातंग समाजाची मोठी लोकसंख्या आहे. या जागेवर निवडणूक लढविण्यासाठी मातंग समाजातील अनेक उमेदवार इच्छुक आहेत. निवडणुकीला आजून बरेच दिवस बाकी आहेत. असे असताना राजकीय पक्षांनी योग्य व लायक उमेदवाराचा शोध घेऊन आगामी निवडणुकीत या संघातून मातंग समाजाचे प्रश्न देशाच्या सर्वोच्च सभागृहात मांडणारा उमेदवार जाहीर करावा. मात्र या वेळेस मातंग समाजाला डावल्यास त्याचे परिणाम नक्कीच दाखवून देऊ, असा इशारा पोळ यांनी दिला आहे. सदर प्रसिद्धीपत्रकावर माजी नगरसेवक सोमनाथ म्हस्के, विनोद वाकळे, शिवनाथ कांबळे, चंद्रकांत कांबळे, भाऊसाहेब आव्हाड, संजय आरणे, ज्ञानेश्वर राक्षे, सोन्याबापू ताते आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget