Breaking News

कोणत्याही पक्ष कार्यकर्त्यांचा मलिदा खाण्याचा संबंध नाही -मनिषा कोकाटे


बीड (प्रतिनिधी): शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीड पंचायत समितीचा कारभार अतिशय पारदर्शीपणाने चालु आहे. यापुर्वी काही वर्तमानपत्रामधुन शिवसंग्राम पंचायत समिती मार्फत विकास कामांना मंजुरी देत नाही किंवा विकास कामे करत नाही. आशा बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. आता वृक्ष संगोपनाच्या महत्वपूर्ण कामाला बीड पंचायत समिती प्राधान्य देत असतांना अवास्तव बातम्या प्रसिध्द करून विकास कामात अडथळा निर्माण करत आहे असे वाटते. काही नतदृष्ट लोकांनी गोरगरीब लोकांच्या विहिरी सुध्दा आडवण्याचा प्रयत्न केला. तरी आम्ही गेली एक वर्षापासुन गोरगरीब शेतकर्यांना विहिरी मिळवुुन देण्याचा प्रयत्न करत आहोत. काही लोकांना असे वाटते कि पंचायत समिती मधुन कोणत्याही लोकांची कामे होवु नये हा त्यांचा प्रयत्न आम्ही सफल होवु देणार नाही. असे बीड पंचात समितीच्या सभापती सौ. मनिषा कोकाटे यांनी पत्रकाव्दारे म्हटले आहे. दि. ११/१०/२०१८ रोजी एका लोकप्रिय दैनिकात वृक्ष संगोपनाच्या नावाखाली शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना ३० कोटी रू. मलिदा या मथळयाखाली बातमी प्रसिध्द झाली. हि बातमी छापतांना संबंधीत वृत्तपत्राच्या संपादकांचा गैरसमज झाल्याचे जाणवते. वृक्ष संगोपनाची कामे संबंधीत ग्रामपंचायत मार्फत करण्यात येतात. मंजुर झालेल्या कामांची मागणी बीड तालुक्यातील सर्वच पक्षांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचातीकडून एक वर्षापुर्वी करण्यात आली होती. या मागणी प्रमाणे प्रस्ताव छाननी कमिटीकडे वर्ग करण्यात आले होते. साधारणतः मे २०१८ दरम्यान समितीकडे प्रस्ताव सादर होेते. १ ऑगस्ट २०१८ रोजी छाननी समितीची बैठक झाली या बैठकी मध्ये छाननी समितीकडील प्रस्ताव तपासुन पुढील कार्यवाही साठी सदरील सर्व प्रस्ताव मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे १० ऑगस्ट २०१८ दरम्यान सादर करून त्यांच्या मार्फत मंजुरीसाठी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे सर्व प्रस्ताव दाखल करण्यात आले. प्रशासकीय सर्व प्रक्रिया पूर्ण करून २९ ऑगस्ट २०१८ रोजी या कामांचे कार्यारंभ आदेश तयार झाले. या सर्व प्रक्रियेसाठी बराच कालावधी लागला. हि संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया असुन या प्रक्रियेशी शिवसंग्रामच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा संबंध नाही.