Breaking News

शस्त्रक्रिया करण्यासाठी कुंबेफळच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून केली आर्थिक मदत


अंबाजोगाई (प्रतिनिधी)- वेळ ही कोणावरही येऊ शकते.सहानभूती समजुन कुंबेफळ येथील ग्रामस्थांनी आज गावात फिरून लोकसभागातून आर्थिक मदत जमा केली. 

कुंबेफळ येथील रहिवाशी असलेला रमेश दत्तू कांबळे हा ड्रायव्हर आहे. याचा दि.२९/११/२०१७रोजी उस्मानाबाद येथून पुण्याला जात असताना टेंभुर्णी जवळ अपघात झाला. या अपघातामध्ये त्याच्या दोनी पायाला मार लागला.त्याला लातूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितल्या नंतर नातेवाईकानी त्याला पुण्याच्या नवले हॉस्पिटलमध्ये दाखल केले.गेली दहा महिने झाले त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत त्याच्या पायावर सोळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शासनाच्या योजनेचा फायदा देखील त्याला झाला, परंतु शस्त्रक्रिया काही यशस्वी होत नाहीत. त्यातच कांबळे कुटुंबाची परिस्थिती हलकीची आहे. रमेशचा मोठा भाऊ जोतिराम कांबळे हा ड्रायव्हर आहे. त्यांनी पण आत्तापर्यंत भरपूर खर्च केला आहे. कांबळे कुटुंब हतबल झाल्याने काही दानशूर वाक्तींनी देखील आर्थिक मदत केली आहे. यामध्ये केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार प्रा. संगिता ठोंबरे-(५०००),मानवलोकचे डॉ. विनायक गाडेकर -(१०,०००),येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी मिळून-(७०००),गावातील रहिवाशी उदोजक संतोष लड्डा ते औरंगाबाद येथे आहेत त्यांनी -(५०००),कुंबेफळचे रहिवासी अंबाजोगाईत वास्तव्यास असलेले कैलास शिंदे(५०००), शिवाजी डोईफोडे (५०००) आणि सर्व गावकर्‍यांनी मदत फेरी काडून (१५,३००)ची आर्थिक मदत जमा केली.सर्वं रक्कम बावन हजार तीनशे रुपये (५२,३००) रमेशचे वडील दत्तू कांबळे यांच्याकडे देण्यात आले.

काढलेल्या मदत फेरीत पत्रकार रोहिदास हातागळे, सुनील आडसूळ,गणेश भोसले, डॉ. विनायक गडेकर,सतीश कांबळे, प्रमोद भोसले, प्रकाश तोडकर, दत्तू कांबळे,बापू इंगोले, गोविंद जाधव, श्रीकांत झिरमाळे,विष्णू सोनावणे ,व्यंकट किर्दत, अंकुश डीवरे यांच्यासह गावकर्‍यांचा मोठा सहभाग होता.