Breaking News

राहुरी फॅक्टरी येथे जनसंघर्ष यात्रेचे जल्लोषात स्वागत


राहुरी ता. प्रतिनिधी

केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात काँग्रेस पक्षाने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेचे देवळालीप्रवरा काँग्रेस कमिटीच्यावतीने आज दि. ९दुपारी ४ वाजता राहुरी फॅक्टरी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

राहुरी कारखाना येथे छत्रपती शिवाजी पुतळा येथे देवळालीप्रवरा काँग्रेस कमिटीच्यावतीने स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. संघर्षयात्रेतील नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात, शोभा बच्छाव, विनायक देशमुख, आ. भाऊसाहेब कांबळे आदींचे स्वागत करण्यात आले. प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव करण ससाणे, चैतन्य उद्योग समुहाचे चेअरमन गणेश भांड, डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष शामराव निमसे, संचालक मछिंद्र तांबे, सभापती सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, दिलीप नागरे, राजेंद्र पाऊलबुद्धे, पंजाबराव भोसले, संजय फंड, संजय छल्लारे, मुख्तार शहा, मनोज लबडे, जि. के. पाटील, भाऊसाहेब डोळस, ज्ञानेश्वर मुरकुटे, नानासाहेब पवार, रामभाऊ लिप्टे, जयसिंग घाडगे, सुधीर नवले, देवळाली काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब खांदे, उत्तम कडू, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र लोंढे, वैभव गिरमे, दीपक पठारे, अनंत कदम, रफ़ीक शेख, विश्वास पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.