Breaking News

आष्टी नगरपंचायतसमोर उपोषण


आष्टी, (प्रतिनिधी):- शहरातील प्रभाग क्र.८ मधील नागरिकांनी रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, पथदिवे अशा मुलभूत सुविधांच्या प्रश्‍नावर येथील नगरपंचायतसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. याठिकाणी नगरसेवक शिंदे यांनी भेट देवून उद्यापासुन रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

आष्टीतील संभाजीनगर प्रभाग क्र.८ मध्ये अनेक सोयी-सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार मागण्या, विनंत्या करुनही नगरपंचायत लक्ष देत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी काल नगरपंचायतसमोर ठिय्या मांडून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या प्रश्‍नी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले असुन निवेदनावर हौसराव आजबे, सुनिल मिरचंदानी, त्रिंबक दिंडे, प्रमोद तावरे, परसमल गळगटे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहे.