Breaking News

भाजपकडून जीवे मारण्याच्या धमक्या - सत्यजित तांबे


मोदींच्या होर्डिंगला काळं फासल्याप्रकरणी युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आज पोलिस महासंचालकांची भेट घेतली. याप्रकरणी आपल्याला भाजपकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं ते म्हणालेत. काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांच्या हत्येप्रकरणी तांबेंसह शिष्टमंडळानं पोलिस महासंचालकांची आज भेट घेतली. त्यावेळी तांबेंनी ही माहिती दिली. अशाप्रकारच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही पण पोलिसांचं यासबर सेल काय कारवाई करतं ? असा सवाल करत एका पोस्टवरुन जर हत्या होत असेल तर भाजपला जिवाची किती किंमत आहे ते कळतं, अशी टीकाही यावेळी केली.