पोलिसांनी केली दोन सराईत दुचाकीचोरांना अटक; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त


।संगमनेर/प्रतिनिधी।

तालुक्यातील पठार भागात वारंवार होणाऱ्या चोरी व घरफोडीच्या घटनांना नागरिक त्रस्त झाले असतानाच घारगाव पोलिसांनी आज एक दिलासादायक बातमी दिली. या पोलिसांना दोन सराईत दुचाकी चोरांना पकडण्यात यश आले आहे.

या कारवाईत भावड्या उर्फ अर्जुन साहेबराव जाधव (वय-२० रा. सोंडेची वाडी, बारागावनांदूर ता. राहुरी) आणि दीपक लक्ष्मण मेंगाळ (वय-१९ रा. नागपूरवाडी पो. पळशी ता. पारनेर) या दोघांना अटक करण्यात आली. तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आंबीखालसा गावात नुकत्याच झालेल्या घरफोडीच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस रात्रीची गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. या गस्तीदरम्यान दोन अज्ञात संशयित लाल रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून संशयितरित्या फिरत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना पकडून चौकशी केली असता त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत अधिक तपास केला असता त्यांच्याकडून सुमारे २ लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. घारगाव पोलीस ठाण्याचे पो. नि. अंबादास भुसारे, पोसई. वाय. आर. मोहिते, पो. हे. कॉ. महादू विखे, पो. ना. संतोष खैरे, पो. कॉ. किशोर लाड, विशाल कर्पे, नामदेव बिरे, यशवंत बांडे, महिला पो. कॉ. अनिता सरगेये यांनी ही कारवाई केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget