निवडणुकीपूर्वी बोललो ते करून दाखविले : काळे


कोपरगाव / प्रतिनिधी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण होत आहे. त्यामुळे मोठे समाधान मिळत आहे. निवडणुकीपूर्वी जे बोललो ते करून दाखविले, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. 

कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे विविध विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या विमल आगवण होत्या. ब्राम्हणगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आगवण यांच्या विकासनिधीतून जिल्हा नियोजन अंतर्गत करंजी जिल्हा परिषद शाळा खोली भूमिपूजन, स्मशानभूमीमध्ये पेवर ब्लॉक बसविणेच्या कामाचा तसेच ओगदी येथील जिल्हा परिषद नूतन शाळा खोलीच्या कामाचा शुभारंभ युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला. ते म्हणाले, की जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये आघाडीची सत्ता असल्यामुळे विकासाच्या बाबतीत ग्रामीण भागात एकाच वर्षात मोठा बदल घडून आला. सर्व जिल्हापरिषद सदस्य व पंचायत समिती सभापती, उपसभापति व त्यांचे सहकारी सदस्य मोठ्या प्रमाणात निधी मिळवित आहेत. जिल्हा नियोजन समितीवर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या एकून १३ तालुक्यातून निवडण्यात आलेल्या ३२ सदस्यांपैकी तब्बल चार सदस्य हे एकट्या कोपरगाव तालुक्यातील असल्यामुळे विकास कामांना वेग आला आहे. 

यावेळी पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, उपसभापती अनिल कदम, कारभारी आगवण, शिक्षणाधिकारी शबाना शेख, बांधकाम विभागाचे क्षीरसागर, नाना आगवण, सांडू पठाण, रोहिदास होन, कारखान्याचे संचालक संजय आगवण, गौतम बँकेचे संचालक अनिल महाले,सरपंच छबू आहेर, ग्रामसेवक गुंड, आबा शिंदे, नाथा आगवण, भास्कर शहाणे, दत्तू बोठे, नवनाथ आगवण, केशवराव चरमळ, मुकुंद आगवण, गोपाल कुलकर्णी, ओगदीच्या सरपंच कल्पना सावंत, श्रीमती विद्या भोईर, भागवत जोरवर, बाळनाथ जोरवर, संदीप सावंत,पोलीस पाटील अनिल चरमळ, सुरेश जोरवर, गणेश गोणटे, सोमनाथ जोरवर, बाळासाहेब भागवत, देवचंद सोनवणे, भास्कर गोणटे आदी मान्यवरांसह ओगदी व करंजीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget