Breaking News

धार्मिक कार्याची दखल वरुनराजा घेईल :धारीवाल


जामखेड/प्रतिनिधी 
जैन स्थानकाच्या माध्यमातून साधु संतांचे विचार मिळणार आहेत, तसेच या विचारातूनच समाजातील मुलांवर चांगले संस्कार घडविले जाणार आहेत. यातुन जैन समाज प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल करत आहे. या होत असलेल्या धार्मिक कार्याची दखल निश्‍चितच वरूणराजा घेईल अशी भावना प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी जामखेड येथील कार्यक्रमात व्यक्त केली. 

या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे खासदार दिलीप गांधी , जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत, विजयकांत कोठारी पुणे,रमेश फिरोदिया, जैन कॉन्फरन्स चे प्रांतीय अध्यक्ष सतीशजी (बाबूशेठ )लोढा, आदी उपस्थित होते. या नंतर बोलताना खा.गांधी म्हणाले की राज्यातील प्रत्येक लहान मोठ्या गावात ज्या ठिकाणी जैन समाज आहे अशा ठिकाणी स्व रसिकलाल धारीवाल यांनी जैन स्थानक उभे करण्यासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी व इतर अनेक समाजातील गरजुंना मदत केली आहे. तोच वारसा घरातील प्रकाश धारीवाल हे पुढे चालवत आहेत. स्थानकाच्या माध्यमातून जैन समाज जीओ और जीने दो या उक्तीप्रमाणे प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल करत आहे. आज समाज सर्व क्षेत्रात आघाडीवर असुन सामाजिक परिवर्तन घडवून आणून विचार देण्याचे काम सौ. लक्ष्मी गादीया, सौ. आरती शिंगवी, सौ. मंजुश्री गांधी करत आहेत. या माध्यमातून लहानपणी मुलांवर संस्कार घडविले जाणार आहेत जेने करून भावी पिढी संस्कारक्षम बनेल. देशात जैन समाजातील मी एकमेव खासदार म्हणून निवडून आलो आहे. त्यामुळे जैन समाजातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या माध्यमातून पुढील कामासाठी पंचवीस लाख रुपये मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही खा. दिलीप गांधी यांनी दिली. यावेळी हस्तीमल मुनोत यांनी एक्कावन हजार, स्व.कमलबाई मुनोत यांच्या स्मृती प्रित्यर्थ कांतीलाल राजेंद्र मुनोत यांनी 51 हजारांची देणगी जाहीर केली. तसेच पनालाल बेदमुथ्था यांनी एक्काहत्तर हजार रुपये मध्ये भक्तांम्बर कलश घेतला. या नंतर जैन स्थानकास चिकटून काही जागा दिल्या बद्दल जामखेड येथील स्व.दानशूर पोपटलालजी बोगावत यांचे पुत्र संदीप बोगावत व परिवाराचा या वेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास अनिल कांकरिया, दिलीप गायकवाड , अनिल संचेती, आण्णाशेठ मुनोत, मनोज कुलकर्णी, नगराध्यक्ष निखील घायतडक, सुर्यकांत मूरे, प्रविण चोरडिया, प्रमोद गांधी, सुनिल पितळे, मामा लोढा, संजय नहार, संजय गुंदेचा, प्रविण छाजेड, कांतीलाल मुनोत, अनिल कोठारी, राजेंद्र कोठारी, राजेंद्र मुनोत, मदनलाल बोरा, गोकुळदास बोरा ,गणेश भळगट आदी उपस्थित होते. कांतीलाल कोठारी, सेक्रेटरी दिलीप गुगळे, उपाध्यक्ष डॉ सी.पी. मेहेर , जैन काँन्फरन्स चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी, अँड नवनीत बोरा ,सुभाष भंडारी , कांतीलाल भळगट ,आसराज बोथरा , विजय गुंदेचा , प्रशांत बोरा , अभय गांधी ,शरद शिंगवी , कुंदनमल भंडारी, संदीप बोगावत, पनालाल बेदमूथ्था. ,संपतलाल बाफना आदी परीश्रम घेतले. सुत्रसंचालन जितेंद्रजी बोरा यांनी केले तर आभार प्रफुल सोंंळकी यांनी मानले.