Breaking News

पिचकार्‍या मारणार्‍या १६ जणांवर कारवाई


बीड, (प्रतिनिधी):- न्यायालय आणि तहसिल कार्यालयाच्या आवारामध्ये धुम्रपान करुन पिचकारी मारणार्‍या १६ जणांविरुद्ध काल सकाळी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल ५ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

बीड येथील शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे पोनि.पुरभे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.पगार, पोहेकॉ.खेडकर, वायभट, बनसोडे, चाटे मॅडम यांनी कोटवा कायद्यातर्ंगत बीड न्यायालय आणि तहसिल कार्यालयाच्या आवारात धुम्रपान करणारे आणि पिचकार्‍या मारणार्‍या १६ लोकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.